दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर यांचा रत्नागिरी येथे पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी
रत्नागिरी दिनांक 15 : (प्रतिनिधी) : रत्नागिरीचे सुपुत्र भक्ती भूषण दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर यांचे स्मारक रूपाने स्मरण राहावे म्हणून शासनाने रत्नागिरी शहरात त्यांचा शासकीय खर्चाने पूर्णाकृती पुतळा उभारावा या मागणीचा रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते दलित मित्र श्री एस बी खेडेकर हे शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. या मागणीला अधिक बळ मिळावे म्हणून खेडेकर यांनी काल श्रीराम मंदिरात झालेल्या श्रीराम मंदिर जेष्ठ नागरिक कट्टाच्या मासिक स्नेह मेळाव्यात या मागणीचा ठराव मांडला आणि त्याला निवृत्त माहिती अधिकारी श्री प्रभाकर कासेकर यांनी अनुमोदन दिले.
या ठरावाला उपस्थित जेष्ठ नागरिकांनी उस्फूर्तपणे एकमुखी पाठिंबा देऊन श्रीमान भागोजी शेठ कीर यांचा पुतळा रत्नागिरी शहरात उभारण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या माध्यमातून शासनाकडे आग्रही पाठपुरावा करण्याचे ठरले. कट्टाचे संयोजक श्री अण्णा लिमये डॉक्टर दिलीप पाखरे, सचिव सुरेंद्र घुडे सभेचे अध्यक्ष ॲड.अजित वायकुळ, रमाकांत पांचाळ आकाशवाणी कलावंत श्रीमती अनुया बाम आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
www.konkantoday.com