जिल्ह्यात 424 ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव आणि 52 ठिकाणी खासगी नवरात्रोत्सव


आजपासून रत्नागिरी जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. जिल्ह्यात 476 ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.90 ठिकाणी फोटोपूजन करण्यात आले.
जिल्ह्यात 424 ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव आणि 52 ठिकाणी खासगी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. नऊ दिवसांचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रौत्सव मंडळांनी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील काही मंदिरामध्ये नवरात्रौत्सव दिमाखात साजरा केला जातो. रत्नागिरीतील भगवती मंदिर, आडिवरेतील महाकाली मंदिर, चिपळूण येथील रामवरदायिनी मंदिर,तुरंबव येथील शारदादेवी मंदिरातील उत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button