चिपळूणच्या विकासासाठी तुम्ही कामे सुचवा, मी निधी देतो-पालकमंत्री उदय सामंत
चिपळूण शहराचा विकास करताना तुम्ही फक्त कामे सुचवा मी निधी द्यायला तयार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांना दिली आहे. शिंदे यांनी नुकतीच सामंत यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी प्रभागातील विकासकामांबाबत ५० लाख रुपयांचा निधी दिला. तसेच निळी व लाल पूररेषा गाळ काढण्यासह नद्यांना संरक्षण भिंत बांधण्याबाबत चर्चा झाल्याची चर्चा झाल्याची माहिती शिंदे यांनी पत्रकारांना दिली.
शिंदे म्हणाले की, आपण शिवसेना उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमत्री सामंत यांची मुंबईत भेट घेतली. यावेळ शहराच्या विकासासंदर्भात चर्चा करताना सामंत यांनी तुम्ही कामे सुचवा, निधी कमी पडणार नाही असे सांगितले. तसेच प्रभागातील विकासकामांसाठी ५० लाख रूपयांचा निधी मंजूर केला.
www.konkantoday.com