
राजापूर नगर परिषदेतर्फेमहेश शिवलकर यांची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर नियुक्ती
स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंंधरा अभियान अंतर्गत राजापूर नगर परिषदेतर्फे सादर करण्यात येणार्या विविध कार्यक्रमांचे ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून दै. सागरचे प्रतिनिधी महेश शिवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची नियुक्ती न.प.चे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केली असून नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
राजापूर न.प. तर्फे दरवर्षी स्वच्छतेच्या अनुषंगाने रॅली, पथनाट्य आदींचे आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमांचे अनुषंगाने ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून स्थानिक प्रतिनिधींना संधी देण्यात येते. दरम्यान समाजहितासंबंधी सुरू असलेली धडपड पाहून उक्त कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी श्री. शिवलकर यांचे नाव सुचविण्यात आले असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. राजापूर शहर ही आपली मातृभूमी असल्याने आपल्यापरीने स्वच्छता अभियानालाही आपला सदैव हातभार राहील, असे श्री. शिवलकर यांनी म्हटले आहे. www.konkantoday.com