बालिकेचा विनयभंग, तरूणास १८ महिने कारावास
दापोली तालुक्यातील एका गावातील बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रवीण प्रताप भोसले (आंजर्ले तळाचाकोंड, ता. दापोली) या तरुणास येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना २०२० मध्ये घडली होती. पीडित बालिका सायकल चालवत असताना तरूणाने बालिकेस बोलावून मोबाईमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवत तिच्या मनात लज्जा उत्पन होईल, असे वर्तन केले. विनयभंग केल्याप्ररणी पोस्को कायद्यांतर्गत दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. या खटल्याची सुनावणी झाली असता सरकारी वकील मृणाल जाडकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिन्यांच्या साध्या कैदेचाही समावेश आहे. या प्रकरणात १० साक्षीदार तपासण्यात आले.
www.konkantoday.com