पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला भारतीय संघाने पराभवाची धूळ चारली
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने दमदार सुरुवात केली आहे. रॉबिन राउंड फेरीतील पहिल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे.पाकिस्तानला वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात आठव्यांदा पराभूत केलं. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने सावध सुरुवात केली. पण नंतर डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. पाकिस्तान 250 ते 300 धावा करेल असं वाटत असताना डाव 191 धावांवरच संपला. पाकिस्तानने 42.5 षटकात सर्व गडी बाद करत 191 धावा केल्या आणि विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं. भारतीय संघाने हे आव्हान 3 गडी गमवून 30.3 षटकात पूर्ण केलं.
भारताने पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे. भारताने न्यूझीलंडला मागे टाकत अव्वल स्थान गाठलं आहे. दुसरीकडे उपांत्य फेरीची वाटही सोपी केली आहे. कारण भारताला अजून दुबळ्या संघांशी सामना करायचा आहे. त्यामुळे नक्कीच फायदा होईल. भारताने 3 पैकी 3 सामने जिंकत 6 गुणांसह +1.821 नेट रनरेटसह अव्वल स्थान गाठलं आहे.
www.konkantoday.com