
राजकारण कोण करतंय आणि प्रत्यक्ष मदत कोण देतंय ते जनतेला समजले आहे-भाजप आमदार प्रसाद लाड
मुख्यमंत्र्यांनी दापोली-मंडणगडसाठी कोट्यवधी म्हणजे नक्की किती कोटींचा निधी देणार त्याचा आकडा रत्नागिरीचे पालकमंत्री परब आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री यांनी जाहीर करावेच.एकूण नुकसानीपैकी ११७कोटींचा निधी प्राप्त झाला, असे सांगत असाल तर नक्की नुकसान किती हजार कोटींचे झाले ते जाहीर करायला का घाबरता? असे प्रतिआव्हान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिले.
बागायतदारांच्या झाडांना महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या वेळी लावलेले निकष लावून नुकसान भरपाई द्या, ही भाजपची मागणी केराच्या टोपलीत गेली. यावरूनच राजकारण कोण करतंय आणि प्रत्यक्ष मदत कोण देतंय ते जनतेला समजले आहे.
www.konkantoday.com