
रत्नागिरी शहरातील सिद्धीविनायक नगर येथे वेश्याव्यवसाय प्रकरणातीलआणखी एकाला जामीन
रत्नागिरी शहरातील सिद्धीविनायक नगर येथे वेश्याव्यवसाय प्रकरणातील अटकेत असलेल्या आणखी एका संशयिताची न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. जामीन मंजूर करताना न्यायालयाने संशयितांनी दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर रविवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावायची असून पोलिसांना तपासात सहकार्य करावयाचे आहे असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
प्रवीण प्रकाश परब (३८, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे जामीन मंजूर करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. यापूर्वी न्यायालयाने मुख्य आरोपी राजेंद्र चव्हाण वगळता इतर सहा संशयितांना जामीन मंजूर केला होता.
www.konkantoday.com