रत्नागिरी मेडिकल कॉलेज बाबत वायफळ मुद्दे काढून विरोधकांचा जनतेत दिशाभूल करण्याचा प्रयत्नशिवसेना तालुका प्रमुख बाबू म्हाप यांची प्रतिक्रिया_________ ▪️ मेडिकल कॉलेजचा जिल्हावासीयांनाच फायदा होणार आहे
▪️ जिल्हा रुग्णालयात आजच्या स्थितीत अतिशय अवघड अशा शस्त्रक्रिया होत आहेत, दुर्धर आजारांवर उपचार दिले जात आहेत: जिल्हा प्रमुख राहुल पंडित
रत्नागिरी –
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची पदे रिक्त आहेत हे सत्य आहे. परंतू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर लगेचच चार डॉकटर जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. काही लोकांच्या दहशतीमुळे जिल्हा रुग्णालयातील डॉकटर पळून गेले आहेत असा सुद्धा इतिहास या रुग्णालयाच्या बाबतीत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुसरी जागा मिळेपर्यंत महिला रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा शासन निर्णय आला. जिल्ह्यातील लोक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याचे स्वागत करत आहेत. परंतु काही लोक विरोधाला विरोध करत आहेत. विरोधकांकडे पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात बोलण्यासाठी मुद्देच शिल्लक राहिले नाहीयेत. आता काहीतरी वायफळ मुद्दे घेऊन उगीचच टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या वायफळ टिकांमुळे कोणत्याही प्रकारचे कन्फुजन निर्माण होणार नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने रत्नागिरी जिल्हावासियांचाच फायदा आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुका प्रमुख बाबू म्हाप यांनी व्यक्त केली आहे. नुकतीच शिवसेनेची पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, उप जिल्हा प्रमुख राजन शेट्ये, शिवसेना रत्नागिरी शहर प्रमुख बिपिन बंदरकर, माजी नगर परिषद सभापती निमेश नायर, अभिजीत दुड्ये आदी उपस्थित होते.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित म्हणाले की, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात डॉकटर येत नाहीत त्याची अनेक कारणे आहेत. परंतू पालकमंत्री उदय सामंत यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. असे जरी असले तरी जिल्हा रुग्णालयात आजच्या स्थितीत अतिशय अवघड अशा शस्त्रक्रिया होत आहेत, दुर्धर आजारांवर उपचार दिले जात आहेत. सर्वाधिक ओपिडी जिल्हा रुग्णालयात होत आहेत. इथे सामान्यातला सामान्य माणूस उपचार घेत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक देखील रुग्णांना चांगल्या सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी रत्नागिरी शहर प्रमुख बिपिन बंदरकर म्हणाले की डॉकटर आणणे हा काही एका दिवसाचा चमत्कार नसतो. त्यासाठी खूप पाठपुरावा करावा लागतो. आजही जिल्हा रुग्णालयात डॉकटर यायला घाबरतात. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
www.konkantoday.com