चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य व खेर्डीचे रहिवासी प्रशांत दाभोळकर आणि अंकुश जंगम यांनी ६०० कि.मी. लांबीची स्पर्धा ३४ तासात पूर्ण केली
सह्याद्री रेन्डोअर्स क्बलतर्फे पाटण-अक्कलकोट-पाटण मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या ६०० कि.मी. लांबीच्या सायकल राईडमध्ये (बीआरएम) चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य व खेर्डीचे रहिवासी प्रशांत दाभोळकर आणि अंकुश जंगम यांनी सहभागी होत ही स्पर्धा ३४ तासात पूर्ण केली.
या स्पर्धेपूर्वी दाभोळकर व जंगम यांनी २००, ३०० आणि ४०० कि.मी.च्या बीआरएम सायकल राईड पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे चारही सायकल राईडस एका वर्षात पूर्ण केल्यामुळे त्यांना सुपर रॅन्डोनियरहा सायकलिंग क्षेत्रात मानाचा समजला जाणारा किताब प्राप्त झाला आहे. ६०० कि.मी. साठी ४० तास वेळ निर्धारित केलेला असताना ऑक्टोबर महिन्यातल्या प्रचंड उन्हाच्या तडाख्यातसुद्धा या दोघांनी ही राईड केवळ ३४ तासात पूर्ण केली. दाभोळकर हे खेडीमध्ये बांधकाम व्यावसायिक असून ते कराटेमध्ये ब्लॅक बेल्टही आहेत. अंकुश जंगम हेही खेर्डीमध्येच व्यावसायिक आहेत. त्यांनी कराटे तसेच रायफल शुटींग या खेळांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले आहे. www.konkantoday.com