हभप नाना जोशी, हभप किरण जोशी यांना शनिवारी कीर्तनातून वाहणार श्रद्धांजली
रत्नागिरी : (कै.) ह. भ. प. महादेव उर्फ नाना जोशी बुवा व (कै.) हभप किरण जोशी बुवा यांचे अलिकडेच दुःखद निधन झाले. त्यांना रत्नागिरीकरांच्या वतीने श्रद्धांजली सभा आणि कीर्तनाचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी दि. १४ रोजी सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत बाजारपेठेतील श्री विठ्ठल मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये कीर्तनकार हभप दत्तराज वाडदेकर बुवा (देवरुख) कीर्तन करणार आहेत. रत्नागिरीतील सर्व कीर्तनकार व प्रवचनकारांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या वेळी रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
www.konkantoday.com