सावंतवाडी टर्मिनस’ला दंडवतेंचे नाव द्यास्मारक समितीची मागणी
कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी खासदार तथा माजी केंद्रीय रेल्वे व अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते यांची स्मृती जपण्यासाठी कोकण रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक रेल्वेस्थानकात प्रा. दंडवते यांचे तैलचित्र लावावे. तसेच सावंतवाडी टर्मिनसचे ‘प्रा. मधू दंडवते टर्मिनस’, असे नामकरण करावे, अशी मागणी प्रा. मधू दंडवते स्मारक समितीच्यावतीने करण्यात आली. याबाबत समितीच्या वतीने पालघर ते सावंतवाडी स्थानकांवर कोकण रेल्वे प्रशासनास निवेदन देण्यात आले.
सावंतवाडीत स्मारक समितीचे निमंत्रक ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, भाई देऊलकर, मिहीर मठकर, सागर तळवडेकर यांनी येथील स्थानकात भेट देत याबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी रेल्वेस्थानक रिक्षा युनियन अध्यक्ष संदीप बाईत, उपाध्यक्ष श्याम सांगेलकर, अजित सातार्डेकर, प्रदीप सोनवणे, दिलीप तानावडे, सचिन तळकटकर, सुरेंद्र गावडे, सचिन गावकर, अजित वैज, एकनाथ नाटेकर, अशोक गावडे, महेश खडपकर, भास्कर तांडेल आदी उपस्थित होते. या निवेदनावर सुमारे ३२० प्रवाशी नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
www.konkantoday.com