
कोकणातील गणपती सणानंतर परतणार्या चाकरमान्यांनी एसटी व रेल्वेचा प्राधान्य दिले
शासनाने या वेळी गणपती उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना अनेक अटी घातल्याने अनेक चाकरमानी कोकणात खाजगी वाहनाने दाखल झाले होते याशिवाय अनेक चाकरमानी कोकणात शिमग्या यापासून थांबले होते आता गणेशोत्सव संपल्यावर हे चाकरमानी मुंबईत परतणार आहेत या वेळी शासनाने एसटी व रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिल्याने चाकरमान्यांनी एसटी व रेल्वेला प्राधान्य दिले आहे एसटीच्या अद्यापपर्यंत 357 गाड्या फूल झाले आहेत यामध्ये अनेकांनी ग्रुप बुकिंग करून एसटी बसेस आरक्षित केले आहेत अनेक चाकरमान्यांनी रेल्वेचा प्रवास करण्याचे ठरवले असून त्यामुळे गणपती सण आटोपल्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत आरक्षण फुल्ल झाले असून अनेकांना वेटिंग वर रहावे लागले आहे
www.konkantoday.com