पुण्याचे सब-इन्सपेक्टर सोमनाथ झेंडे एका रात्रीत झाले करोडपती ,ड्रीम इलेव्हन वर दीड कोटी रुपये जिंकले
पुण्याच्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असणाऱ्या सब-इन्सपेक्टर सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम इलेव्हन वर दीड कोटी रुपये जिंकले आहेत. मागच्या तीन महिन्यांपासून सोमनाथ झेंडे ड्रीम इलेव्हनवर टीम बनवत आहेत.बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यासाठी झेंडे यांनी ड्रीम इलेव्हनवर टीम लावली होती. सामना संपल्यानंतर सोमनाथ झेंडे यांनी त्यांचा मोबाईल चेक केला तेव्हा त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. सोमनाथ झेंडे यांची टीम पहिल्या क्रमांकावर आली होती.
ड्रीम इलेव्हनवर दीड कोटी जिंकल्यानंतर सब इन्सपेक्टर करोडपती झाले आहेत, त्यामुळे त्यांचं कुटुंबही खूश झालं आहे. तरीही ऑनलाईन गेमिंग धोकादायक असल्याचं झेंडे यांनी सांगितलं. अशा गेम्सपासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे, कारण याचं व्यसन लागून आर्थिक नुकसानही होऊ शकतं, असं आवाहन सब इन्सपेक्टर सोमनाथ झेंडे यांनी केलं आहे.
हे पैसे मिळाले असले तरी आपण पोलीस दलात राहणार आणि देशसेवा करणार आहे. मिळालेल्या रकमेपैकी काही रक्कम समाजकार्यासाठी वापरणार आहे, तसंच हे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार असल्याचं झेंडे यांनी सांगितलं. सोमनाथ झेंडे हे जेजुरीचे आहेत.
ड्रीम इलेव्हनवर ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून पैसे कमावले जातात, जो भारतीय स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म आहे. ड्रीम इलेव्हनवर फॅन्टसी क्रिकेटशिवाय फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल आणि कबड्डी खेळता येऊ शकते.
www.konkantoday.com