
निरामय योगा संस्था रत्नागिरी तर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे विद्यार्थ्यासाठी योग शिबिर
निरामय योगा संस्था रत्नागिरी तर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे दिनांक ११ऑक्टोबर रोजी १००विद्यार्थ्यासाठी योग शिबिर आयोजित केले होते.
निरामय योगा संस्थेचे पतंजलि चे मुख्य योग प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रिय योग प्रशिक्षक विरू स्वामी सर यांनी विद्यार्थ्यांना योगासने,प्राणायाम,मुद्रा, ॲक्युप्रेशर इत्यादी प्रात्यक्षिक सादर केले,तसेच विद्यार्थ्या कडून करून घेतले
*योगा चे फायदे,योगाच्या नियमित सरावाने सर्व आजार अगदी पहिल्या दिवसापासून नियंत्रणात येतात,आणि नियमित योग सरावाने सर्व आजार पूर्ण बरे कसे होतात याची माहिती समजाऊन सांगितले.
*२ तास योग सराव करून मुलांनी आपले अनेक प्रश्न स्वामी सरांना विचारले,आणि स्वामी सरांनी सर्व प्रश्नांची छान उत्तरे दिली,
*वैद्यकीय महाविद्यालय चे डीन जयप्रकाश रामानंद सर आणि डॉ. शैलेश गवंडे यांनी स्वामी सरांचेआणि त्यांचे सहकारी उपेंद्र सुर्वे, शरद नागवेकर,स्नेहल नागवेकर, कींजल मोरे, शिवराज स्वामी, आरती स्वामी, लक्ष्मी स्वामी यांचे आभार मानले.
www.konkantoday.com
