चिपळुणात रेल्वे प्रवाशाची बॅग चोरीस


कोचिवली सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशाची बॅग चोरीस गेल्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद केशर रमाकांत मंगेशकर (६३, गोवा) यांनी दिली. ४ जुलै रोजी कोचिवली सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून केशर मंगेशकर पनवेल ते गोवा असा प्रवास करत होते. यावेळी त्यांनी त्यांची बॅग सीटवर ठेवली असताना ही रेल्वे सावर्डे रेल्वेस्थानकात थांबली असता या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्याची बॅग चोरून नेली. त्यात २४ हजारांचा मुद्देमाल होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button