हातखंबा गावातील महामार्गाचा तिसरा आराखडा मंजूर


मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेले हातखंबा गावातील काम आता लवकरच मार्गी लागणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. या परिसरातील तिसर्‍या आराखड्याला मंजुरी मिळाली असून त्या अनुषंगाने भूसंपादन करण्याच्या कामाला वेग आला आहे मुंबई-गोवा महामार्गाच्या कामातील अनेक दिवस चर्चेत असलेला आणि या महामार्गातील अत्यंत महत्वाचा अशा टप्प्याचा आराखडा आता मार्गी लागणार असल्याचे चित्र स्पष्ट होवू लागले आहे.
मुंबई-गोवा महामार्ग (एन.एच. ६६) आणि मिर्‍या नागपूर महामार्ग (एन. एच. १६६) हे दोन्ही महामार्ग ज्या ठिकाणी एकत्र येतात असा अत्यंत महत्वाचा टप्पा नक्की कसा होणार याबाबत अनेक चर्चाना उधाण आले होते. या जंक्शनजवळ असलेला पेट्रोलपंप आणि त्यासाठी लागणारा सर्व्हिसरोड नक्की कसा होणार याचा आराखडा आता मंजुर करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार आता हातखंबा हायस्कूलपासून सुरू करण्यात आलेला फ्लायओव्हर पुढे गावातील दर्ग्याजवळ मुख्य रस्त्याला सामील होणार आहे. सर्व्हिसरोड तयार करण्यासाठी आता तारवेवाडी २५.३५ गुंठे व रावणंगवाडीतील ३५.३० गुंठे क्षेत्राचे भूसंपादन करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button