रत्नागिरी तालुक्यातील जांभारी खाडीत आढळलेल्या मृताची ओळख पटली

रत्नागिरी तालुक्यातील जांभारी खाडीत अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात जयगड पोलिसांना यश आले. रेहमुद्दीन रहिमान मन्सुरी (६२) असे मृताच नाव आहे. मंगळवारी हा मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालय येथून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जांभारी खाडीत अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याचा प्रकार ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास स्थानिकांच्या निदर्शनास आला. त्यानुसार पोलिसांनी या मृतदेहाविषयी स्थानिक परिसरात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची अद्याप ओळख पटली नव्हती. दरम्यान पोलिसांनी मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे रवाना केला होता.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button