रत्नागिरीत ताप सर्दी आणि खोकल्याचे रुग्णातमोठ्या प्रमाणावर वाढ , रत्नागिरी शासकीय रुग्णालयात बेड अपुरे पडले म्हणून बेंचवरच उपचार सुरू
सततच्या बदलत्या वातावरणामुळे महिनाभरामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ताप सर्दी आणि खोकल्याचे रुग्णातमोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे तसेच शहरात डेंगू चे रुग्णही सापडत आहेत त्यामुळे खाजगी रुग्णालयात तापांच्या रुग्णात वाढ झाली ताप आणि त्यानंतर येणारा खोकला यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शासकीय रुग्णालयात रुग्णाला मोफत उपचार मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना जिल्हा शासकीय रुग्णालय हक्काचे वाटते. त्यामुळे रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण आल्यामुळे मुळे त्यांना ऍडमिट करून घेण्यासाठी रुग्णालयात बेडच शिल्लक राहिलेले नाहीत. तरीदेखील रुग्णाला परत जायला लागू नये म्हणून रुग्णालयातील बसण्याच्या बेंचवर सलाईन लावून रुग्णांना ऍडमिट करून घेण्यात आले आहे
रत्नागिरीत आता मेडिकल कॉलेज झाल्यामुळे यापुढे तरी सरकारी रुग्णालयात सुविधा उपलब्ध होतील अशी आशा आहे
www.konkantoday.com