निष्ठावंत व जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांना डावलल्याने लांजा तालुका राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात फूट?
लांजा तालुका भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडली असून पक्षाच्या निष्ठावान व जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांचा एक गट पक्षाला रामराम ठोकून वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे.
लांजा तालुका कॉंग्रेस पक्ष हा अंतर्गत कुरबुरीने व्यापला आहे. त्यामुळे निष्ठावान व जुन्या -जाणत्या कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. लोकशाही मार्गाने चालणार्या कॉंग्रेस पक्षात सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून त्यांची मते ऐकून त्यावर निर्णय घेतले जातात. मात्र लांजा तालुक्याच्या बाबतीत वेगळे चित्र असल्याचे या नाराज कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. लाजा तालुका कार्यकारिणीची साधी बैठकही होत नाही.
जुन्या-जाणत्या निष्ठावान कार्यकर्त्यांना कधीही या बैठकीबाबत विश्वासात घेतले जात नाही. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. लोकांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र त्यावर कधीही आंदोलन झाले नाही किंवा तालुका कार्यकारिणीत तशी चर्चाही झाली नसल्याचे या नाराज कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com