
कुवारबांव येथे गायीवर कुदळाने वार करणार्या आरोपीवर गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरानजिक कुवारबांव बाजारपेठ परिसरात गायीच्या पोटावर कुदळ-फावड्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न करणार्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल अर्जुन वाडकर (रा. कुवारबांव, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
अनिल वाडकर यांचे कुवारबांव येथील गाळे आहेत. ९ ऑक्टोर २०२३ रोजी दुपारी त्यांच्या गाळ्यामध्ये गाय बसलेली होती. या गोष्टीचा राग आल्याने अनिल वाडकर याने कुदळ-फावडे घेवून त्यानी गायीच्या पोटावर वार केले, अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली. या प्रकरणी सुशांत सुरेश मेगाने (३४, रा. पत्रकार कॉलनी, कुवारबाव रत्नागिरी) यानी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अनिल वाडकर याच्याविरूद्ध भादवि कलम ४२९ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
www.konkantoday.com