आपल्या सांस्कृतिक चळवळीने विशेष ठसा उमटविणार्या संस्कृती फाऊंडेशनचा नाबाद १०० वा नाट्यप्रयोग
रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण माराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक चळवळीने विशेष ठसा उमटविणार्या रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील संस्कृती फाऊंडेशन या संस्थेने सादर केलेल्या नाटकांचा ९९ हा टप्पा पार केला. आता येत्या २२ ऑक्टोबरला रत्नागिरी तालुक्यातील श्री वाघजाई कलामंच झरेवाडी रत्नागिरी येथे १०० वा प्रयोग संस्कृती सादर करणार असून क्राईम पेट्रोल फेम सिनेअभिनेता असित रेडीज या प्रयोगाला उपस्थित राहणार आहेत.
१५ एप्रिल २०१३ साली संस्थेचे संस्थापक राजेश गोसावी आणि सहकारी मिळून ही संस्था स्थापन केली. सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक अनेक उपक्रम राबवले. समाजाकडून वेळोवेळी उत्तम साथ व सहकार्य मिळालं. संस्थेने आतापर्यंत चांदणवेल, धमाल करामती बायकोची, आम्ही लग्नाशिवाय, गर्लफ्रेंड बाबाची, यही तो लाईफ है बॉस आणि माझ्या अंगणी नाचते दुसर्याची बायको या नाटकाचे रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आतापर्यंत ९९ प्रयोग केले.
www.konkantoday.com