आधी नवीन भरती, मगच आंतर-जिल्हांतर्गत बदल्या


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या या नवीन शिक्षक भरतीसाठी राज्यस्तरावरील शिक्षण विभागास्तरावरून थांबवल्या आहेत. नवीन भरती प्रक्रिया झाल्यानंतर शिक्षक बदल्या पूर्वीप्रमाणे होणार आहेत. तर आंतरजिल्हा बदल्या या सर्व जिल्हा परिषदांच्या बिंदूनामावली अद्ययावत होवून बदली पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर होणार आहेत.
प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांवरून यावर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला गदारोळ उडाला. जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा हा राज्यात सर्वोत्तम मानला जात असला तरी गेली अनेक वर्षे जिल्हा परिषद शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या वाढली आहे. दरवर्षी त्या रिक्त पदांमध्ये आंतरजिल्हा बदल्यांची भर पडत आहे. यावर्षी तर ७१५ शिक्षक परजिल्ह्यात पाठवण्यात आले. त्यामुळे दरवर्षीच आतरजिल्हा बदल्या या वादग्रस्त ठरत आहेत. जि.प.च्या बिंदूनामावली पोर्टलवर अपलोड झाल्यावरच शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात येणार असल्याने बदल्यांमधील भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होणार असल्याचे ग्रामविकास विभागाकडून सांगितले जात आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button