मडगांव-नागपूर एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशाची पर्स चोरीला
मडगांव-नागपूर एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करत असताना महिला प्रवाशाची पर्स चोरट्याने चोरून नेल्याची घटना ८ ऑक्टोबर रोजी चिपळूण रेल्वेस्थानकात घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबियांसह ८ ऑक्टोबर रोजी कणकवली ते चिपळूण दरम्यान मडगांव-नागपूर एक्स्प्रेस गाडीमधून प्रवास करत होते. यावेळी ही रेल्वेगाडी चिपळूण रेल्वेस्थानकात आली असता फिर्यादी यांच्या पत्नीजवळ असलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या पर्समध्ये १८ ते १२ हजार किंमतीचा मोबाईल, तसेच १ हजाराची रोख रक्कम असा ३१ हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com