
स्वच्छतागृहाच्या अस्वच्छतेबद्दल खुलासा करण्याची उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना नोटीस
*रत्नागिरी, दि.९ – उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयानजिकचे स्वच्छतागृह हे अत्यंत अस्वच्छ असल्याची बातमी वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झाली आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे. हे स्वच्छतागृह तात्काळ स्वच्छ करण्याची कार्यवाही करावी. तसेच याबाबत तात्काळ समक्ष खुलासा सादर करावा, अशी नोटीस उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) शुभांगी साठे यांनी उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना आज पाठवली.
शासकिय कार्यालयात कामकाजानिमित्त सतत नागरिक येत असतात. अस्वच्छ स्वच्छतागृहामुळे नागरिकांना दुर्गंधीचा
त्रास होत आहे. याबाबत ऑगस्टमध्ये आपल्या नजीकच्या स्वच्छतागृहामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे आढळून आले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आपणास प्रत्यक्ष सूचना दिल्या होत्या. तसेच दि. १ सप्टेंबर रोजी घेतलेल्या बैठकीमध्येही आपणास सूचना देण्यात आल्या
होत्या. तरीही आपल्या कार्यालया नजीकच्या स्वच्छतागृहामध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून
येत आहे. या स्वच्छता गृहाच्या स्वच्छतेबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. तसेच
स्वच्छतागृहाच्या अस्वच्छतेबाबत तात्काळ समक्ष खुलासा सादर करावा, असे यात म्हटले आहे.
www.konkantoday.com