
रत्नागिरीकरांच्या धावनगरी रत्नागिरी मोहिमेला पुरातत्व विभागाची साथ.
रत्नागिरी जिल्हा फिटनेस टुरिझम ऑफ इंडिया साठी प्रसिद्ध होऊ शकतो या संकल्पनेतून सुवर्णसूर्य फाउंडेशन ने कोकण कोस्टल मॅरेथॉन चे आयोजन केले आहे. आणि या मॅरेथॉन च्या माध्यमातून नवीन वर्षाचा पहिला रविवार दरवर्षी रत्नागिरी धावनगरी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. रत्नागिरीकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद धावनगरी रत्नागिरी मोहिमेला मिळत आहे आणि यात भारतीय पुरातत्व विभाग देखील सहभागी झाला आहे.
रजिस्ट्रेशन प्रक्रियेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला आहे . कोकणामध्ये ही संकल्पना जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचावी यासाठी सराव सत्रा ची सुरुवात रत्नागिरी मध्ये झाली आहे. ही सराव सत्र रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळी घेण्याचा फाउंडेशन चा विचार होता आणि त्यासाठी थिबा पॅलेस प्रांगणाची ची निवड करण्यात आली. निवेदन दिल्यापासून एक दिवसाच्या आत सर्व परवानग्या मुंबईहून मिळाल्या. चांगल्या संकल्पनेला रेड कार्पेट ट्रीटमेंट चा अनुभव रत्नागिरीकरांना आला आणि थिबा राजवाड्याच्या प्रांगणाचे दरवाजे सराव सत्राच्या वॉर्मअप साठी सकाळी ५:४५ वाजता उघडले, यासाठी असिस्टंट डायरेक्टर डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजि चे डॉक्टर विलास वहाणे,श्री शांताराम केकाडे अभियंता पुरातत्व विभाग रत्नागिरी , सौ. रुची शेटे समन्वयक(तंत्र सहायक) यांनी सहकार्य केले. पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनायाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे हे शासकीय कामानिमित्त लंडन इथे होते त्यांनी तेथूनच या रत्नागिरीकरांच्या स्तुत्य उपक्रमाची दखल घेत आवश्यक ते निर्देश दिले.थिबा राजवाड्याची व्यवस्था पाहणारे सेवक श्री दीपक बाणे यांनी भल्या पहाटे थिबा प्रांगणाचे दरवाजे रत्नागिरीकरांसाठी खुले केले आणि सराव सत्र संपेपर्यन्त ते स्वत: तिथे उपस्थित होते
पोलीस भरती प्रशिक्षण घेणाऱ्या सौरभ रवणांग आणि त्यांच्या टीम ने रत्नागिरीकरांचे वॉर्मअप सेशन घेतले. वय वर्ष ७ ते वय वर्ष ६७ एवढ्या वयोगटातील सुमारे ६० होऊन अधिक रत्नागिरीकर या सराव सत्रामध्ये सहभागी झाले. थिबा राजवाडा ते मारुती मंदिर आणि पुन्हा थिबा राजवाडा असं हे सराव सत्र होते . हॉटेल गोपाळ च्या मृत्युंजय खातू यांनी हायड्रेशन पॉईंट ची व्यवस्था केली होती. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब च्या विनायक पावसकर यांनी जवळपास ८ मिनिट प्रति किलोमीटर या वेगाने या धाव मार्गावर नेतृत्व केले . डॉक्टर नितीन सनगर यांनी त्यापेक्षा कमी वेगाने ने पाठीमागे राहून सर्वाना प्रोत्साहित केले
रत्नागिरी सायकलिस्ट क्लब च्या योगेश मोरे,सुहास ठाकूरदेसाई, राकेश होरांबे, श्रद्धा रहाटे, बॉबी सावंत, अमित कवितके, अजिंक्य प्रभुदेसाई, धीरज पाटकर, मृणाल वाडेकर यांनी धाव मार्गावर मार्गदर्शन केले . अशाच रत्नागिरीतील प्रसिद्ध स्थळांच्या ठिकाणी ही धावसत्र अयोजीत करून ही सर्व ठिकाणं जागतिक पटलावर धावनगरी रत्नागिरी च्या माध्यमातून प्रसार आणि प्रचार करण्याचा हा सुवर्णसूर्य फाउंडेशन चा आणि रत्नागिरीकरांचा प्रयत्न आहे असे फाउंडेशनच्या प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले. ऍथलेटिक्स असोसिएशन चे सेक्रेटरी संदीप जी तावडे यांनी कुल डाऊन सेशन घेतले. कोकण कोस्ट्ल मॅरेथॉन मध्ये
खालील लिंक वर क्लिक करून जास्तीतजास्त रत्नागिरीकरानी नाव नोंदणी करावी,
आणि मॅरेथॉन च्या तसेच सराव सत्राच्या च्या अधिक माहितीसाठी ९१५१५५१५४७ या सुवर्णसूर्य फाऊंडेशन च्या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले
www.konkantoday.com