मनसेच्या टोल नाका विरोधी आंदोलनाला मुलुंड मध्ये हिंसक वळण,मुलुंड टोलनाका पेटविण्याचा प्रयत्न, मनसे कार्यकर्ता ताब्यात
मुंबई : मनसेच्या टोल नाका विरोधी आंदोलनाला मुलुंड मध्ये हिंसक वळण लागले आहे. मुलुंड टोल नाक्यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
त्यानंतर मनसे च्या कार्यकर्त्यांनी टोल नाका पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ठाण्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर टोल नाक्याच्या केबिन मध्ये पेट्रोल आणि टायर पेटून टाकण्यात आले आहे. यामुळे ही केबिन आणि त्यातील साहित्य जळून खाक झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
टोल नाक्यावरील एका केबिनमध्ये पेटता टायर टाकणाऱ्या मनसे कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये जवळपास दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com