
तुम्हाला शेती करण्यासाठी मोफत गुरे पाहिजेत! मग नगर परिषदेची संपर्क साधा
रत्नागिरी, : शहर परिसरातील मोकाट जनावरे रत्नागिरी नगर परिषदेमार्फत पकडून चंपक मैदान येथे ठेवण्यात आली आहेत. शेतकरी अथवा सेवाभावी संस्था यांनी ही गुरे शेती कामासाठी मोफत घेऊन जावीत, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले आहे.
चंपक मैदान येथील जनावरांसाठी सामाजिक संस्था, सेवाभावी संस्थांनी चारा दान करावा, असे आवाहनही नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे. ज्या शेतकरी अथवा सेवाभावी संस्थांना ही जनावरे हवी आहेत त्यांनी नगर परिषदेशी संपर्क साधावा. पाळण्यासाठी तसेच शेतीकामासाठी ती देण्यात येतील. त्याचबरोबर त्याची सर्व नोंद नगर परिषदेमार्फत ठेवण्यात येणार आहे.
www.konkantoday.com