चिपळूण शहरालगतच्या बुद्ध लेणीठिकाणचा धम्मध्वज अज्ञाताने काढला
चिपळूण शहरालगतच्या बायपास मार्गावरील बुद्ध लेणी ठिकाणी असलेला धम्मध्वज अज्ञाताने काढून तो लगतच असलेल्या डोंगर भारातील एका पाण्याच्या साठवण टाकीठिकाणी टाकल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते. त्या अज्ञाताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरात सीसीटीव्ही पुटेज तपासले जात होते.
काही दिवसांपूर्वी या लेण्याठिकाणी बसवण्यात आलेल्या बुद्ध प्रतिमेची अज्ञाताने विटंबना केल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी त्या अज्ञाताचा शोध घेवून त्याला अटक केली होती. या घटनेनंतर लेण्याठिकाणी सुरक्षिततेचा विचार करता पोलिसांनी लेण्याठिकाणी बॅरीकेटस तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. असे असताना या लेण्यांचे नामफलक असलेल्या ठिकाणी धम्मध्वज लावण्यात आला होता. मात्र तो अज्ञाताने काढून या लेण्या परिसरात असलेल्या डोंगर भागातील रस्त्यालगतच्या एका पाण्याच्या साठवण टाकीवर जाण्यासाठीच्या लोखंडी शिडीवर टाकून ठेवला होता. ही घटना बावशेवाडीतील काही नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी याची माहिती चिपळूण पोलिसांना दिली. www.konkantoday.com