कोकण रेल्वेचा १० व १२ ला मेगाब्लॉक
कोकण रेल्वे मार्गावारील कडवई – रत्नागिरी विभाग आणि मडगाव – कुमटा विभाग या मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रत्नागिरी विभागात १० आँक्टोंबरला तर मडगाव विभागात १२ आँक्टोंबरला दोन ते तीन तासाचा हा मेगाब्लॉक आहे.यामुळे रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील कडवई – रत्नागिरी विभागात मंगळवारी (ता.१०) सकाळी ७.४० ते १०.४० यावेळत काही रेल्वे गाड्यांच्या सेवेवर परिणाम होणार आहे. गाडी क्र. १९५७७ तिरुनेलवेली ते जामनगर एक्स्प्रेसचा प्रवास ठोकूर – रत्नागिरी विभागादरम्यान तीन तासांसाठी थांबला जाईल. गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास ९ ऑक्टोंबरला ठोकूर ते रत्नागिरी विभागादरम्यान दिडतासानंतर नियमित केला जाईल. गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस खेड – चिपळूण विभागादरम्यान वीस मिनिटांसाठी नियमित केली जाईल. मडगाव – कुमटा विभागांत १२ तारीखला सकाळी अकरा ते दुपारी दोन यावेळत काही रेल्वे सेवेवर होणारे आहे. गाडी क्र.०६६०२ मंगळुरु सेंट्रल – मडगाव ही गाडी कुमटा स्थानकावर थांबेल
www.konkantoday.com