अडखळ हर्णै येथे आरएचपी फाउंडेशनतर्फे दिव्यांग शिबिर


हर्णै : दापोली तालुक्यातील अडखळ- हर्णै येथे रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या (आरएचपी) वतीने दिव्यांगांचे मार्गदर्शन शिबीर आयोजीत करण्यात आले. या शिबीरासाठी दापोली तालुक्यातील बहुतांशी दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित होते.

अडखळ येथील श्रीमती फैरोजा शिरगावकर यांच्या निवासस्थानी हे शिबिर झाले. दापोली तालुक्यातील पाजपंढरी, अडखळ आणि हर्णै परिसरातील दिव्यांगांचा चांगला प्रतिसाद लाभला. या वेळी आरएचपी फाऊंडेशनचे सदस्य समीर नाकाडे यांनी शासनाच्या विविध दिव्यांग योजनांनबद्दल सविस्तर माहिती दिली. दिव्यांगांना अपंग प्रमाणपत्र कसे काढले जाते, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ५ टक्के निधी कसा मिळवायचा याची माहिती दिली. दिव्यांग पेन्शन, दिव्यांग व्यवसाय कर्ज, मतिमंद दिव्यांगांसाठी पालकत्व करणे का आवश्यक आहे आणि ते कसे घ्यायचे? याचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर दिव्यांगांच्या शंकांचे निरसरन केले. आरएचपी फाउंडेशनच्या या शिबिराचा लाभ दिव्यांगाना मिळणार असल्याने दिव्यांगांनी फाउंडेशनचे आभार मानले.

आरएचपी फाऊंडेशनचे सदस्य प्रिया बेर्डे, सलमा शेख, रवींद्र मुकनाक, संदीप भुवड (कर्दे) उपस्थित होते. गावातील नुरजहाँ पटेल, बानु अलीमा कडु, बानु ईसाक मस्तान, वहीदा मोहसीन कारभारी, पुष्पा पावसे, सुगंध पावसे, बद्रुनीसा शिरगावकर, तनुजा जोगळे, नाझील सोलकर, ईकबाल वाकणकर, नफीसा कोतवलकर, तेहरीन काझी, नमीजा पटेल, आरिफ काझी, हसीना, गुफरान दर्वेश, फैरोजा शिरगावकर, शादाफ वाकणकर, नुपुरा पावसे, साई काळेकर आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button