
वाघनखे रत्नागिरीत येणार-मंत्री उदय सामंत
लंडनहून आणलेली वाघनखे तीन वर्षे भारतात राहतील, असा करार आहे. तीन वर्षात ती कोठे कोठे ठेवली जातील, ते निश्चित करण्याचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील जगातील पहिले अभ्यासकेंद्र रत्नागिरीमध्ये होणार आहे. तेथे ही वाघनखे काही काळासाठी असावीत, अशी मागणी आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे आणि त्यांनी ती मंजूरही केली आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
www.konkantoday.com