
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक शिवसेनाच लढणार, मात्र अंतिम निर्णय महायुतीचे तीन नेते घेणार
▪️ किरण उर्फ भय्या शेठ सामंत यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी माझी व सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे
▪️ पालकमंत्री ना. उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया
रत्नागिरी प्रतिनिधी:
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्व करत असलेल्या शिवसेना पक्षच लढणार असा आमचा ठाम दावा आहे. आमचे बंधू किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनी ही लोकसभा निवडणूक लढवावी अशी आमची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र यासंदर्भात अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अन्य अन्य मित्र पक्ष मिळून घेतील, ते जो निर्णय देतील तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केली.
मागील काही दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. ना. उदय सामंत यांचे बंधू आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेचे कार्यकारी समितीचे संचालक किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनी ही निवडणूक लढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत ना. उदय सामंत म्हणाले की आम्ही कुटुंब म्हणून सगळे निर्णय घेत असतो. किरण उर्फ भैय्या शेठ सामंत शिवसेना पक्षाचेच काम करतात. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनी लढवावी अशी आम्हा सर्वांचीच मागणी आहे. अशी प्रतिक्रिया पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com