रत्नागिरी शहरातील एकता मार्ग येथेतरूणाच्या ताब्यातून ८० हजारांचे हेरॉईन जप्त
रत्नागिरी शहरातील एकता मार्ग येथे तरूणाच्या ताब्यातून शहर पोलिसांनी ८० हजार रुपयांचे हेरॉईन हा अंमली पदार्थ जप्त केला मोहसीन अब्दुल गणी शेख (३६, रा. आरसी चर्च रोड, बाजारपेठ रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याच्याकडून ९३ कागदी पुड्यांमधून हेरॉईन हस्तगत करण्यात आले. मागील काही दिवसांपासून शहर पोलिसांकडून अंमली पदार्थांची विक्री करणार्यांविरूद्ध मोहीम उघडली आहे. त्यानुसार एकता मार्ग येथील संसारे उद्यान परिसरात अंमली पदाथाची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ३ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० च्या सुमारास छापा टाकला. यावेळी संशयित आरोपीच्या ताब्यात हेेरॉईन हा अंमली पदार्थ आढळला. संशयिताविरूद्ध शहर पोलिसांत एन. डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. www.konkantoday.com