
दाभोळ मुरुड तुळजापूर कोल्हापूर साठी दापोली आगारातर्फेनवरात्र विशेष फेऱ्या…
दापोली :-नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांसाठी दापोली आगारातर्फे विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सौ.रेश्मा मधाळे यांनी दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री नामदार श्री.एकनाथ शिंदे यांच्या संकल्पने नुसार एसटी संगे देवदर्शन हा उपक्रम संपूर्ण राज्य मध्ये राबविला जात आहे. श्रावणात दापोली आगारातून ६ कोल्हापूर दर्शन, २ तुळजापूर-अक्कलकोट दर्शन, ४ मार्लेश्वर दर्शन अश्या बसेस सोडण्यात आल्या होत्या त्याला प्रवाश्यांना उत्तम प्रतिसाद लाभला. त्याचधर्तीवर नवरात्रोत्सवानिमित्त पुन्हा विशेष बस सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यामध्ये दापोली १५ ऑक्टोबर पासून सकाळी ६.३० वाजता सुटणारी दापोली नाशिक ही बस वणी सप्तशृंगी गड पर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे दुपारी ०४.०० वाजता दापोली कोल्हापूर ही नवीन बस सेवा सुरू करण्यात येणार असून कोल्हापूर वरून सकाळी ६.३० वाजता दापोली साठी रवाना होणार आहे. त्याचप्रमाणे दापोली तुळजापूर ही बस संध्याकाळी ०६.३० वाजता सुटणार असून तुळजापूर वरून ही बस दापोली साठी रात्री ०८.०० वाजता सोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हर्णै पाजपंढरी येथून प्रवासी उपलब्धतेनुसार एकविरा देवी दर्शन ही बस सोडण्यात येणार असून दापोली तालुक्यातील विविध गावांमधून त्या-त्या ग्रामस्थांच्या मागणी नुसार दाभोळ येथील श्री.देवी चंडिका व मुरुड येथील श्री.दुर्गादेवी दर्शन या विशेष बस सेवा सुरुकरण्यात येणार असून महिलांसाठी ५०%, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी १००% मोफत प्रवास सेवा उपलब्ध असणार आहे. या बससेवांचा फायदा जास्तीत जास्त महिला बचतगटांनी घ्यावा असे आवाहन दापोली आगाराकडून करण्यात आले आहे.
www.konkantoday.com