जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा अण्णा हजारेंना डिवचलं


राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेते जितेंद्र आव्हाड आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. अण्णा हजापे यांनी आव्हाडांनी केलेल्या एक्सवरीव पोस्टवरून कोर्टात जाणार असल्याचे म्हटले आहे.यानंतर जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट केली असून पुन्हा अण्णा हजारेंना डिवचलं आहे.

‘ह्या माणसाने या देशाचं वाटोळं केलं.. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही’ अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. यासोबत त्यांनी अण्णा हजारे यांचा फोटो देखील पोस्ट केला होता. यानंतर गुरुवारी सायंकाळी अण्णा हजारे यांनी माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यासंबंधी वकिलांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं. त्यामुळे हे प्रकरण पेटताना दिसत आहे.दरम्यान या इशाऱ्यानंतर आव्हाडांनी पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, “माझ्या ट्विट नी ह्यांना जाग आली. कोर्टात खेचतो ह्याला म्हणजे मला असे पत्रकारांना म्हणाले. चला झोपेतून तर उठले बघू उद्या पासून जागे राहतात का” असे आव्हाड म्हणाले आहेत. आव्हाडांनी जुन्या पोस्टला रिप्लाय देत ही नवीन पोस्ट केली आहे. त्यामुळे आव्हाडांविरोधात अण्णा हजारे खरंच कोर्टात जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button