अण्णा हजारे जितेंद्र आव्हाडांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. अण्णा हजारे जितेंद्र आव्हाडांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहेत.जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारेंबद्दल ट्वीट केलं होतं, त्यानंतर अण्णांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यामुळे देशातील नागरिकांचं भलं झालं, मात्र त्यांच्या काही कार्यकर्त्यांना सत्तेपासून दूर व्हावं लागलं, याची खंत त्यांच्या मनात असावी, असं प्रत्युत्तर अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाडांना दिलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारेंचा एक फोटो शेअर केला, यात त्यांनी ‘ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले, टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही’, अशी टीका केली होती. या टीकेनंतर अण्णा हजारेंनी जितेंद्र आव्हाडांना अब्रु नुकसानीची नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.जितेंद्र आव्हाड कोण आहेत आणि अण्णा हजारे कोण आहेत? हे जगाला माहिती आहे. हे सांगायची काही गरज नाही. जितेंद्र आव्हाड एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत. अण्णा हजारेंनी देशाचं वाटोळं केलं असं ते स्वत:च्या फायद्यासाठी बोलत आहेत. वाटोळं तर तुम्ही केलं आहे. अण्णा हजारेंनी 10 कायदे केले, हे कायदे पक्षांनी कधी केले नसते. चांगले कायदे केल्याचं जग म्हणत आहे,’ असं अण्णा हजारे म्हणाले.
‘मी वकिलांचा सल्ला घेत आहे, वकिलांनी सांगितलं तर अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहे. समाजाच्या भल्यासाठी माझ्या भल्यासाठी नाही. समाजाच्या भल्यासाठी दावा ठोकणं गरजेचं आहे,’ अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.
www.konkantoday.com