
२०२४ ला केंद्रातून आणि राज्यातून भारतीय जनता पक्षाला हद्दपार करायचे आहे-शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव
राज्यात गेल्या आठ महिन्यांत ९ ठिकाणी जातीय दंगली झाल्या. या मागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचे समोर आले आहे.राजकीय स्वार्थासाठी भाजपकडुनदंगली घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांनी डोके शांत ठेवून मतदान करावे. २०२४ ला केंद्रातून आणि राज्यातून भारतीय जनता पक्षाला हद्दपार करायचे आहे,’ असे प्रतिपादन शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी केले. समाजात द्वेष निर्माण करून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून केले जात आहे. राज्यात गेल्या ८ महिन्यांत ९ दंगली झाल्या. दोन वर्षांपूर्वी माझ्या गुहागर मतदारसंघातही दंगल होणार असल्याचे भाकीत मी केले होते. त्यानंतर तेथे दंगल झाली.
त्या दंगलीमागे भाजप होता. २०२४ साली निवडणुकीत आपला टिकाव लागणार नाही हे भाजपला माहिती आहे. त्यामुळे राज्यात आणि देशात भाजपकडून दंगली घडवल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच सर्व धर्मीयांनी शांत राहून मतदान करून भाजपला सत्तेतून हद्दपार करावे.
www.konkantoday.com