सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण जिल्हा दौऱ्यावर
*रत्नागिरी, : राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 6 ऑक्टोबर रोजी सकाळ 6.23 वाजता पनवेल रेल्वेस्थानक येथे आगमन व जनशदाब्दी एक्सप्रेसने चिपळूण, जि. रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी 9.40 वाजता चिपळूण रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह चिपळूणकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता उत्तर रत्नागिरी भाजपा पक्ष कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती. (स्थळ : ब्राम्हण सहाय्यक संघ हॉल, चिपळूण, जि . रत्नागिरी) दुपारी 2 वाजता चिपळूण येथून रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता रत्नागिरी येथे आगमन व दक्षिण रत्नागिरी भाजपा पक्ष कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती. (स्थळ : स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका, जि. रत्नागिरी) रात्री 7 वाजता रत्नागिरी येथून कसेरी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्गकडे प्रयाण.
www.konkantoday.com