सदिच्छा फाउंडेशन संस्थेचे आजवर १०० हून अधिक रुग्ण व नातेवाईकांना मोफत डबा पुरवण्याचे काम


लांजा तालुक्यातील वेरळ गावचे सुपुत्र सचिन गुंड्ये यांनी. सदिच्छा फाउंडेशनच्या माध्यमातून सहकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील केईएम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील आणि विशेषत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना मोफत टिफिन पुरवण्याचे काम सचिन गुंड्ये आणि त्यांचे सहकारी हे करत आहेत. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केल्या जाणाऱ्या कामाचे आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

लांजा तालुक्यातील वेरळ गावचे सुपुत्र असलेले सचिन गुंडये हे व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथे राहतात .व्यवसायाच्या निमित्ताने फिरत असताना अनेकदा केईएम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील आणि आपल्या गावाकडील आणि विशेषता कोकणातील गोरगरीब जनतेची जेवण खाण्यापासून होणारी हेळसांड त्यांनी पाहिली होती. आणि म्हणूनच आपल्या गावातील, आपल्या कोकणातील या गोरगरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून त्यांनी सुरुवातीला त्यांनी केईएम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना स्वखर्चाने मोफत टिफिनची पुरवण्याचे काम सुरू केले .मात्र आपला काम धंदा, व्यवसाय सांभाळून या सर्व गोष्टी करणे सहज सोपे नव्हते. म्हणूनच त्यांनी सदिच्छा फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली.

या संस्थेच्या माध्यमातून सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी हळूहळू आपल्या या कामाचा व्याप वाढवला. सचिन गुंडये आणि सहकारी यांच्या हे सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सुरू असलेले काम लक्षात घेऊन आजवर अनेकजण आर्थिक मदतीसाठी पुढे येत असतात. गेल्या दोन महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या सदिच्छा फाउंडेशन या संस्थेने आजवर १०० हून अधिक रुग्ण व नातेवाईकांना मोफत डबा पुरवण्याचे काम केले आहे.

या कामातून मिळणारा आनंद हा वेगळाच असल्याचे सचिन गुंड्ये यांनी सांगितले. गोरगरीब रुग्णांचे आशीर्वाद आपल्याला आणि सदिच्छा फाउंडेशनच्या पुढील कार्यासाठी तारणहार ठरतील असे स्पष्ट मत सचिन गुंडये यांनी व्यक्त केले. दरम्यान सदिच्छा फाउंडेशनच्या या कामात अध्यक्ष सचिन गुंड्ये, सचिव रुपेश बाराम यांच्यासह कांचन शिंदे, अजिंक्य नेमण, विनोद पारदले, विक्रांत वारीशे, ओमकार पाटोळे, राम वाडकर, अंकुश मेस्त्री, श्रुती खेडेकर, मंगेश गिजम, नेहा माळकर ,प्रदीप जाधव, समृद्धी चव्हाण, संदेश गुरव, संतोष बावकर, विश्वनाथ मांडवकर ,प्रदीप घडशी, दीनानाथ पाटोळे, सोनाली साटम, श्वेता गुट्टी, प्रमोद मसणे यांचे सहकार्य लाभते. तर संस्थेच्या या कार्यात अनेकांनी आर्थिक मदतीचा हात देखील पुढे केला आहे. त्यामध्ये वीणा घाडीगावकर ,मनीष सावंत, धनंजय पाथरे, सुनील दांगट यांचा समावेश आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button