शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत व महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टरांच्या सत्कार कार्यक्रम पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडणार
*रत्नागिरी, दि.5 :-रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत व महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टरांच्या सत्कार कार्यक्रम पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्या पार पडणार आहे राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 6 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.25 वाजता कोंकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत व महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टरांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती
(स्थळ: शासकीय स्त्री रुग्णालय, उद्यमनगर, रत्नागिरी) सकाळी 11 वाजता थ्रीडी मँपोंग मल्टीमिडीया कामांबाबत आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) . सकाळी 11.30 वाजता नगरविकास विभाग व इतर विभागांनी मंजूर केलेल्या नगरपरिषद अंतर्गत विविध विकास कामांचा आढावा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) दुपारी 12.30 वाजता पोलीस विभागाच्या प्रस्तावित बांधकाम प्रकल्पाबाबत आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी 1.30 वाजता मंडणगड दिवाणी न्यायालय उद्घाटन व भूमीपूजन तसेच जिल्हा सत्र न्यायालय, रत्नागिरी येथील रविंद्रनाथ टागोर यांचे धातूशिल्पाचे अनावरण संदर्भात आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी)
दुपारी 2.00 वाजता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विविध समित्यांचा आढावा( स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय,रत्नागिरी )
दुपारी 4 वाजता चवे, ता. जि. रत्नागिरी येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: चवे, ता.जि.रत्नागिरी) सायंकाळी 5 वाजता देऊड, ता. जि. रत्नागिरी येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: देऊड, ता. जि. रत्नागिरी). सांयकाळी 6 वाजता चाफे, ता. जि. रत्नागिरी येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : चाफे, ता. जि. रत्नागिरी) रात्रौ 8 वाजता तालुकास्तरीय युवासेना आढावा बैठक. (स्थळ : पाली, ता.जि. रत्नागिरी). रात्रौ सोईनुसार पाली, ता. जि. रत्नागिरी राखीव
www.konkantoday.com