राजापुरात पुन्हा मोकाट जनावरे, श्वानांचा मोठा वावर
राजापूर नगर परिषदेने मोकाट गुरे व उनाड कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मोठी घोषणा केली. मात्र ह घोषणा हवेतच विरली असून शहरामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर मोकाट गुरे व उनाड कुत्रे फिरत असताना दिसत आहेत. यामुळे यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
गेले काही दिवस शहरात मोकाट गुरे व उनाड कुत्रे यांचा वावर वाढला असून शहरातील रहदारीच्या ठिकाणी गुरे व कुत्र्यांचा वावर असल्याने नागरिकांना याचा त्रास होत आहे. विशेषतः उनाड कुत्र्यांचा खूप उपद्रव ठरत आहे. येणार्या जाणार्यांच्या अंगावर भुंकणे, अंगावर धावून जाणे असे प्रकारही घडत आहेत. तर मोकाट गुरे रस्त्यावरच ठिय्या मांडून बसतात. परिणामी वाहतुकीला अडथळा होत असून वाहतूककोंडीही होत आहे. तर दुसरीकडे दर गुरूवारी भरणार्या गणेशपाटावरील आठवडा बाजारात तर या मोकाट गुरांचा त्रास सहन करावा लागत आहे. आठवडा बाजारात गायी, बैलांसह म्हशींचाही वावर होत असतो. यामुळे व्यापारी व ग्राहकांची तारांबळ उडते. www.konkantoday.com