
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या लेखक संवाद कार्यक्रमात दिग्गज लेखक साधणार संवाद
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने शनिवार दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता अनेक प्रतिथयश लेखकांबरोबर संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे.
‘जग बदलणारे ग्रंथ’ या 50 ग्रंथांचा संक्षिप्त सारांश लिहिणा-या, तसेच जीनिअस -12 सारख्या पुस्तक मालिकांनी सोप्या भाषेतील विज्ञानाचे नवे दालन वाचकांना उपलब्ध करून देणा-या व्यासंगी लेखिका दीपा देशमुख, प्रबोधनात्मक व स्त्रियांच्या समस्या हाताळणारे मासिक म्हणून सुप्रसिध्द असेलेल्या ‘आकांक्षा’ या मासिकाच्या संपादिका अरुणा सबाने, तसेच मानसशास्त्र, विज्ञान, आरोग्य, शिक्षण, अंधश्रद्धाविरोधी पुस्तके असे विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन करुन पुस्तकविश्वात सुप्रसिध्द असलेल्या मनोविकास प्रकाशनाचे प्रकाशक अरविंद पाटकर, विज्ञान प्रचारक व लेखक म्हणून स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे लेखक नितिन हांडे व मुंबई नगरीचा सात बेटं असल्यापासून किंबहुना त्याही आधीपासून आजवरचा सारा प्रवास शोधून तो शब्दबद्ध करणारे ‘अज्ञात मुंबई -कहाणी मुंबईच्या ऐतिहासिक पाऊलखुणांची’ या सुप्रसिध्द पुस्तकाचे लेखक साळुंखे नितीन असे प्रतिथयश लेखक रत्नागिरीकरांच्या भेटीला येत आहेत.
एकाचवेळी पाच प्रथितयश लेखक-प्रकाशक एकत्र भेटीचा योग या संवाद कार्यक्रमामुळे जूळून आला असून ही साहित्यिक मेजवानी रसीक प्रेक्षकांना वेगळ्याच साहित्य विश्वात घेऊन जाईल. या पाच साहित्यिकांना प्रश्न विचारत त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे. हा संवाद सुलभ व्हावा यासाठी प्रसिध्द साहित्यिक अभिजित हेगशेटे हे संवादक म्हणून लाभणार आहेत.
या प्रतिथयश लोकप्रिय लेखकांना भेटण्यासाठी त्यांचेबरोबर संवाद साधण्यासाठी रसिकजनांनी आवर्जून या संवाद कार्यक्रमाला शनिवार दि. 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय सभागृहात उपस्थित रहावे असे आग्रही निमंत्रण रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक म. पटवर्धन यांनी केले आहे.
www.konkantoday.com