
मुंबईत खोली मिळवून देतो असे आश्वासन देवून २४ लाखांची फसवणूक
रत्नागिरी घुडेवठार, दत्तमंदिर येथे राहणारे फिर्यादी मुकेश भिमजी खाकोडीया हे व्यापारी असून फिर्यादी याचा मामेभाऊ आरोपी क्र. १ प्रकाश यशवंत उगरेजीया याने त्याच्या नावावर असलेली कर्वेनगर कांजुरमार्ग मुंबई येथील रूम फिर्यादीच्या नावावर करून देतो असे सांगून फिर्यादी व फिर्यादीच्या भावाकडून २४ लाख ५० हजार रोख तसेच ऑनलाईन पद्धतीने स्विकारून दोन्ही आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने या रूमऐवजी अंधेरी राम मंदिरजवळील दुसर्याच्या नावावर असलेली रूम दाखवून फसवणूक केली. या फसवणुकीच्या आरोपावरून आरोपी प्रकाश यशवंत उगरेजीया व दिनेश उगरेजीया या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. www.konkantoday.com