उपोषणास बसलेल्या अविनाश काळे व इतर सर्व शेतकऱ्यांची भाजपा जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी घेतली भेट
शेती बागायती साठी त्रासदायक ठरणाऱ्या वानर माकडे यांचे विरुध्द उपाययोजना न होत असल्यामुळे उपोषणास बसलेल्या अविनाश काळे व इतर सर्व शेतकऱ्यांची भेट भाजपा जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी घेतली त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्वरित मा.अति.जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व ठोस उपाययोजना करणेसाठी शासनाकडे प्रस्ताव त्वरित पाठविण्याच्या सूचना केल्या.त्यानंतर जिल्हाध्यक्ष यांनी वन परिक्षेत्र विभागाच्या कार्यालयात भेट देऊन तेथील अधिकारी श्री.गावडे याना उपोषणस्थळी आणून काळे व सर्व शेतकरी यांचेशी चर्चा केली व त्यांचेकडूनही उपाययोजना करण्यास सूचना केल्या यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदयजी बनेही तिथे उपस्थित होते.
www.konkantoday.com