ही तर रत्नागिरी करांची कृपा….
कधी राजकारणात आलो..आमदार झालो..राज्यमंत्री झालो..कॅबिनेट मंत्री झालो, कळलेच नाही..बघताबघता उद्योग मंत्री झालो..भूतकाळातील उद्योग मंत्री आठवले मा.शरद पवार साहेब, विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण, नारायणराव राणे, सुभाष देसाई यांच्या रांगेत मला मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या मुळे बसता आलं.. पण कृपा रत्नागिरी करांची.. माझ्यावर असणारा त्यांचा विश्वास मी कधीही विसरू शकत नाही..
लंडन वरुन निघालो विमानात वेळ भरपूर आहे विचार आला थोड लिहाव..कारण राजकारणात मी येईन अस मला देखील वाटल नव्हत..मस्त सकाळी उठून चालू असलेल्या आमच्या कंपनी च्या साईट वर जायच संध्याकाळी मित्रांबरोबर क्रिकेट खेळायचे रात्री बाहेर जेवायचे आणि उशिरा घरी यायचे हा दिनक्रम..सकाळी उठायला उशिर झाला की अण्णा च्या शिव्या खायच्या हे नित्याचेच होते..पण मजा होती..
1998 ला अपघाताने राजकारणात आलो आणि सगळच बदलल..1999 सालात खरी सक्रिय राजकारणाला सुरुवात झाली मा.पवार साहेबांच्या आशीर्वादाने..2004 ला आमदार, 2014 राज्य मंत्री, 2016 पंचायत राज समिती अध्यक्ष, 2017 म्हाडा प्राधिकरण अध्यक्ष, 2019 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि आत्ता उद्योग मंत्री..मागे वळून बघितले तर डोक सुन्न होत..एवढा पल्ला कसा पार केला ह्याच माझ मला आश्चर्य वाटत..
ह्या पूर्ण टप्प्यात प्रत्येकवेळी संघर्ष केला तो माझ्या जिवाभावाच्या सहकाऱ्यांना घेऊन..त्यांच देखील मला फार कौतुक आहे..माझ्या प्रत्येक सुख दुःखात ते माझ्या सोबत राहिले आणि पुढच्या काळात सुद्धा राहणार ह्याची खात्रीआहे…
गेले 15 दिवस आपल्या राज्यात जे आरोप प्रत्यारोप चालू आहेत त्याचा लोकाना पण वैताग आला असेल..असो ..
पण एक नक्की आहे कालचा वाघनखा चा कार्यक्रम माझ्या नशिबात होता..मुख्यमंत्री यांचा दौरा रद्द झाला..त्यावरून पण राजकारण, मी आलो त्यावरुन पण राजकारण..सध्या काही लोक “खोट बोला पण रेटून बोला”ह्या भूमिकेत आहेत देव त्यांच भलं .करो .काल तर मी छत्रपती शिवरायांनी ज्या वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा काढला त्या वाघ नखाच्या समोर होतो आणि आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण न क्षण मी अनुभवत होतो.. अंगावर रोमांच उभा करणारा तो क्षण होता.. ते भाग्य माझ्या नशिबी आलं ते कोणा मुळे..फक्त आणि फक्त रत्नागिरी वासियांच्या आशीर्वादामुळे..
माझ्या या पूर्ण यशस्वी वाटचालीचे श्रेय निव्वळ रत्नागिरीकरांचे त्यांच्या माझ्यावरील असीम विश्वासाचे निस्सीम प्रेमाचे,याचे कारण 1970 साली अण्णा एकत्र रत्नागिरी जिल्हा असताना रत्नागिरीत आले स्थायिक झाले..पाली आणि रत्नागिरी वासियानी त्या क्षणापासून आम्हाला स्वीकारले हे आमच्या कुटुंबातील प्रत्येकाचे भाग्य आहे म्हणुनच म्हणतो आमच्या उत्कर्षांत रत्नागिरी तील जनतेचे आशीर्वाद आणि प्रेम आहे..अनेक लोक परदेशात जातात पर्यटनासाठी.. पण मी लंडन ला 36 तास होतो.. ह्या वेळात..”वाघनख” MOU कार्यक्रमाला उपस्थित राहिलोच पण 13 शिष्टमंडळाशी संवाद साधला ह्याचा उपयोग देखील महाराष्ट्राच्या उद्योग जगताला होईल ह्यात तिळमात्र शंका नाही…
उदय सामंत