
निलेश सांबरेंच्या शिवसेना प्रवेशाने असंतुष्ट पडले उताणे, पालकमंत्री उदय सामंत यांचा टोला.
जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांच्या शिवसेना प्रवेशाने सांबरे रूग्णालय उदघाटन कार्यक्रमाच्या व्यासपीठावरील असंतुष्ट मंडळी नुसती आपटली नाहीत तर उताणी पडली, असा उपरोधिक टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.सोमवारी रत्नागिरी दौर्यावर असलेल्या मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सांबरेना पक्षप्रवेशासाठी सर्वांकडून ऑफर देण्यामागणी कारणे वेगवेगळी होती. परंतु सांबरेच्या कार्याला पाठिंबा देणे शिवसेना म्हणून कार्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी होती, असे ते म्हणाले.पुणे येथील साकव दुर्घटनेनंतर उबाठा नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराच्या केलेल्या आरोपांवर सामंत म्हणाले की भ्रष्टाचार झाला असेल तरर चौकशी होईल, तसे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.www.konkantoday.com