सेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर, 6 ऑक्टोबरऐवजी 9 ऑक्टोबरला सुनावणी


शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेची सुनावणी आता 9 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. यापूर्वी ही सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार होती.

शिवसेना आमदार अपात्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यावर सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीवेळी 6 ऑक्टोबरची तारीख देण्यात आली होती. परंतु, आता ही सुनावणी लांबणीवर गेल्यामुळे पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे. सलग दुसऱ्यांदा आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर गेली आहे. आधी सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणावरील सुनावणीसाठी आधी 3 ऑक्टोबर, मग 6 ऑक्टोबर आणि त्यानंतर आता 9 ऑक्टोबरची तारीख देण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button