श्री अंबिका योगासनाचे तज्ञ श्री विनायक देसाई यांच्या योगासन शिबिराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी : ठाणे येथील श्री अंबिका योगासनाचे योगातज्ञ श्री विनायक श्रीराम देसाई यांच्या रत्नागिरीतील श्रीराम मंदिरात ज्येष्ठ नागरिक कट्टाच्या वतीने दिनांक 3 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या योगासन शिबिराला आबाल वृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कट्टाचे मुख्य संयोजक अण्णा लिमये यांनी त्यांचे स्वागत केले तर सचिव सुरेंद्र घुडे यांनी देसाई यांच्या योगा क्षेत्रातील कार्याचा परिचय करून दिला
योगा विविध आजारावर मात करणारे प्रभावी औषध असून सर्व वयोगटातील नागरिकांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमित योगासने केली पाहिजेत. दैनंदिन शिस्तबद्ध दिनचर्या बरोबरच आहाराचे वेळापत्रक योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आचरणात आणावे, असे सूचित केले. वयाच्या सत्तरीनंतर चालण्याचे प्रमाण कमी करून योगासनावर भर दिला जावा अतिचालल्यामुळे सांधेदुखीचे आजार उद्भवू शकतात याची जाणीव ठेवावी, असे सुचित केले.
यावेळी श्री अंबिका योगासनाच्या तज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षक श्रीमती वैशाली जोग, श्रीमती सुरेखा डाफळे, शालिनी केतकर यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर योग तज्ञ श्री. विनायक देसाई यांनी उपस्थितानी विचारलेल्या प्रश्न आणि शंकांचे समाधानकारक निरसन केले.
यावेळी श्री राम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाच्यावतीने योग तज्ञ श्री देसाई यांचा श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीराम मंदिर संस्थेचे कोषाध्यक्ष श्री संतोष रेडीज रमाकांत पांचाळ श्रीमती अनुया बाम, दिलीपराव साळवी, विवेक जोशी उपस्थित होते उपस्थित नागरिकांच्या आग्रहास्तव योग तज्ञ श्री. देसाई यांनी दोन महिन्यानंतर पुन्हा श्रीराम मंदिरात आपली सेवा रुजू करण्याचे अभिवचन दिले. तसेच शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
www.konkantoday.com