
निलेश राणे यांना उमेदवारी दिली गेली तर आम्ही त्यांचे काम करू- उदय सामंत.
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांची कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा आहे. त्यासाठी बुधवारी दुपारी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची ‘वर्षा’वर जाऊन भेट घेतली.कुडाळची जागा शिवसेनेकडे असल्याने या भेटीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. निलेश राणे शिवसेनेत येणार की कुडाळची जागेची अदलाबदल होऊन भाजपला देणार, याविषयी तर्कवितर्क सुरू असतानाच याविषयी मंत्री उदय सामंत यांनी मोठा खुलासा केला आहे.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याचे काम सुरू असताना तथापि उमेदवारांची निवड अंतिम टप्प्यात आलेली असतानाच नारायण राणे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. कोकणातील विधानसभा निवडणुकीची तयारी आणि संभाव्य समीकरणांवर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर उदय सामंत देखील हजर झाले. त्यांनीच बैठकीत काय काय चर्चा झाली, त्याबद्दलची माहिती दिलीनारायण राणे हे विद्यमान खासदार आहेत. ते कोकणातल्या विकासकामांसाठी चर्चा करण्यासाठी गेले असावेत. कुडाळ-मालवण विधानसभेवर आमचा (शिवसेना शिंदे गट) दावा होता. महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना अधिकार आहेत. जर निलेश राणे यांना उमेदवारी दिली गेली तर आम्ही त्यांचे काम करू, असे उदय सामंत म्हणाले.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी नारायण राणे यांचे काम केले नाही, असे आरोप राणेपुत्रांनी उघड उघड केले. राणे पुत्रांच्या आरोपांमुळे सामंत-राणे यांच्यात काहीसा तणाव निर्माण झाला. काम करूनही माझ्यावर आरोप होत असल्याचे सांगत सामंत यांनी नाराजी दर्शवली होती